महाराष्ट्र पोलिसात भरती झालेल्या युवकांचा ग्रामस्थांकडून सत्कार

🔸शिक्षण हे व्यवस्था परिवर्तनाच माध्यम

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.28 एप्रिल) :-

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये महागाव तालुक्यातील वागद इजारा येथील अभिजीत सुभाष जाधव,कु.वंदना उत्तम राठोड यांची महाराष्ट्र पोलीस म्हणून निवड झाली. यामुळे संपूर्ण गावात या निवडीचे पेढे वाटून जल्लोष साजरा करून या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गुलालाची उधळण करत संपादन केलेल्या यशाचा कौतुक सोहळा प्रा. नरेंद्र जाधव ,व गावकऱ्यांच्या वतीने आयोजन करण्यात आला होता. 

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या घवघवीत यश संपादनासाठी त्यांना वेळोवेळी मानसिक मनोबल, धीर देणाऱ्या त्यांच्या आई -वडिलांचा देखील या वेळेस शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या गावाचे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक मोतीराम चव्हाण सेवानिवृत्त मुख्याध्यापक या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी म्हणून तर प्रमुख उपस्थिती शेतकरी नेते मनीष जाधव या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते. आपल्या अभिभाषणातून शेतकरी नेते मनीष जाधव उपस्थित गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताउना मागील पंधरा वर्षात या दुर्गम डोंगरी भागाच्या तांडा वस्तीतून गावात अनेक विद्यार्थ्यांनी फुले,शाहू, आंबेडकर, शेतकऱ्यांचे आराध्य दैवत वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक साहेब यांच्या आदर्श विचाराचा वारसा घेऊन अथक प्रयत्नांची पराकाष्टेच्या बळावर घवघवीत यशाची परंपरा कायम ठेवली. महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या या अभिजीत,वंदनांचे लागलं (इ.) वासियांना सार्थ अभिमान आहे. शिक्षण हे व्यवस्था परिवर्तनाचे माध्यम असून यंत्रणेला प्रश्न करण्याची ताकद व समाजात सन्मान,प्रशासकीय सेवेतून समाज कार्य करण्याची संधी शिक्षणातून मिळते असते असे प्रखड मत या‌ छोटेखानी सत्कार कार्यक्रमातून शेतकरी नेते मनीष जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. या गावात दोन न्यायाधीश व गतवर्षी यूपीएससी कु.मोहिनी प्रल्हाद खंदारे हिने यूपीएससी परीक्षेत नेत्रदीप यश मिळून या गावाचं नाव देशात लौकिक केले. विविध विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये कष्ट,जिद्द, प्रयत्नांची पराकाष्टा करून यश मिळवून या गावातील अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून आज राज्यभर विविध प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. उपस्थित मान्यवरांचे यावेळी मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाला गावाचे नाईक रमेश सवाई जाधव, अशोक धर्मा जाधव, उत्तम रामदास राठोड , सुभाष गोबरा जाधव , तुकाराम नानू राठोड, प्रल्हाद गुलाब राठोड ,हिरासिंग पवार,मनोहर चव्हाण,अशोक पवार,सुनील राठोड, कैलाश महाराज, मोहन दलसिंग राठोड, श्रीराम जाधव,काशीराम जाधव, मनोहर राठोड, मदन राठोड, 

रवी राठोड, उमेश राठोड, दावला काळे,दिगंबर देवकर,गणेश खोकले यांच्या सह मोठ्या संख्येने गावकरी, विद्यार्थी, महिला या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव चव्हाण तर प्रस्ताविक प्रा. नरेंद्र जाधव यांनी केले.सर्व गावकऱ्यांनी वंदना आणि अभिजीतला आपल्या आशीर्वाद स्वरूपी शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले.