✒️गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.17 फेब्रुवारी) :-
चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडा रथ यात्रा महोत्सव २०२६ ची सांगता शिव पार्वती विवाहाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन झाली.
दिनांक २३ जानेवारी पासून श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. सतत २४ दिवस सुरू असलेल्या या यात्रेदरम्यान रथसप्तमी. गरुड वाहन. मारोती वाहन. श्रीहरी बालाजी महाराज यांची चिमूर नगरीत परिक्रमा. कृष्ण जन्म. गोपाल काला. हरिभक्त पारायण स्नेहल संतोष पित्रे मुंबई यांचे नारदीय कीर्तन. शास्त्रीय गायिका गौरी देवेश भुतडा यांच्या भक्ती गीताचा कार्यक्रम असे विविध परंपरागत धार्मिक कार्यक्रम श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान परिसरात संपन्न झाले. यात्रा महोत्सवानिमित्ताने मशहूर गायिका पलक मुछल. भजन गायिका मिथाली ठाकूर. गायक. निर्देशक. अँकर आदित्य नारायण यांचे लाईव्ह कन्सेप्ट चिमूर नगरीत संपन झाले. विविध झुले. खेळणीचे दुकाने. सेल महासेल. व मनोरंजनाच्या क्षेत्रातील विविध प्रकारचे शो आणि भरपूर मनोरंजन व लाखो भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा महोत्सव २४ दिवस चालली.
यात्रा महोत्सवाचा आखरी दिवस म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भगवान श्रीहरी बालाजी मंदिर परिसरात स्थित दक्षिय भारतीय शैलीत स्थानापन असलेल्या शिव मूर्तीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. दुपारी 3 वाजता चिमूर शहरातून शिव मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजता शिव पार्वती विवाह हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शिव विवाह प्रसंगी हनुमान चालिसा पठण प्रसारक मंडळ खडसंगी यांच्या वतीने जागर शिवभक्तीचा सुमधुर भक्तिगीताचा कार्यक्रम संपन्न झाला. दिवसभर भाविकांची गर्दी दर्शनासाठी रांग लागली होती. रात्री महाआरतीने यात्रा महोत्सव ची समाप्ती झाली.







