एस.एस.पाटील यांची ‘बालभारती’ निवड

✒️ शेख रफिक माहूर(Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर (दि.8 फेब्रुवारी) : -तालुक्यातील नवी आबादी माहूर येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक शेषराव पाटील यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे अर्थात बालभारतीवर समीक्षण सत्रासाठी निवड झाली आहे.

         बालभारतीचे विशेष विषाधिकारी (भाषा) श्रीमती सविता वायाळ यांनी पत्रकाद्वारे याबाबत कळविले आहे. शालेय शिक्षण अभ्यासक्रम (प्रस्तावित) 2025 वर प्रथम मराठी ‘बालभारती’ इयत्ता सहावी पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीचे काम पाठ्यपुस्तक मंडळाने हाती घेतले आहे. या पाठ्यपुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यासाठी स्थापित झालेल्या समीक्षण समितीवर एस.एस. पाटील यांची निवड झाली आहे. 

        निवडीबद्दल शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी योजना दिलीपकुमार बनसोडे, गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार , गटशिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, बाबुराव माडगे, उत्तम कानिंदे, मिलिंद कंधारे, बालभारती सदस्य रमेश मुनेश्वर, मिलिंद जाधव, मुख्याध्यापक संजीव वाठोरे, भाग्यवान भवरे, रणजीत वर्मा, मुख्याध्यापिका ललिता जोशी, फॅन्सी नखाते, लियाकत अली,जमीर शेख, सयद मुजीब

 आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.