✒️ शेख रफिक माहूर(Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.9 फेब्रुवारी) :-
राजा भगीरथ विद्यालय, चिंचखेड तालुका किनवट जिल्हा नांदेड या शाळेत दत्त भक्त माझे मित्र माननीय श्री बी. आर. चौधरी पाटील कलाध्यापक म्हणून 1998 पासून कार्यरत होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजेच चिंचखेड ज्या ठिकाणी महाराजांच्या कमल चरणाचा स्पर्श झाला त्याच ठिकाणी महाराजांचे मंदिर उभारले मंदिरात आसनस्थ प्रतिमा आहे त्या दिवसापासून गुरुदेव सेवा मंडळ स्थापन झाले. गावातील भाविक भक्त आजही तिथे दररोज सायंकाळी सामुदायिक प्रार्थना घेतात अशा या पावन पवित्र भूमीत माझे मित्र श्री बी आर चौधरी सर यांनी 28 वर्ष शैक्षणिक कार्य केले आज दिनांक 31 जानेवारी 2026 शैक्षणिक सेवेतून निवृत्त झाले त्यांना निरोप देताना शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्रीमान एच.एन.राठोड सर व शिक्षक वृंद,कर्मचारी गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर शाळेतील सर्व विद्यार्थी या सर्वांनी सरांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.







