महाराष्ट्राच्या विकासाचा एक चेहरा हरपला

✒️महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.28 जानेवारी) :-

राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांचे विमान दुर्घटनेत झालेले दुर्दैवी निधन अत्यंत वेदनादायी आहे. अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा एक प्रभावी चेहरा हरपला आहे.

काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. आर. आर. पाटील साहेब असताना, गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अजित दादांनी कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. जिल्ह्यातील रस्ते, सिंचन तसेच इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

दादा हे कार्यकर्त्यांना जपणारे, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी, विकासाभिमुख आणि जनतेशी नाळ जुळवून ठेवणारा नेता गमावला असून, कार्यकर्त्यांचा आधारवड हरपला आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा

-महेंद्र ब्राह्मणवाडे जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी गडचिरोली