✒️महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.28 जानेवारी) :-
राजकारणातील ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक व वेदनादायी आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने केवळ पवार कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
अजितदादा हे कर्तृत्ववान, स्पष्टवक्ते, निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व होते. राज्याच्या सर्वाधिक काळ अर्थमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी मोलाची व निर्णायक भूमिका बजावली. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले ठोस निर्णय, मजबूत प्रशासकीय पकड आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी सदैव स्मरणात राहील. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांची दिशा पाहिली.
महाराष्ट्राने आज एक उमदा, अनुभवी आणि प्रभावी नेता गमावला असून, राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी व अपरिमित हानी झाली आहे.
*भावपूर्ण श्रद्धांजली*
डॉ. नामदेव किरसान खासदार, गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्र







