✒️महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.27 जानेवारी) :-
भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुतेच्या मूल्यांचा गौरव करणारा ७७ वा प्रजासत्ताक दिन जिल्हा काँग्रेस कार्यालय, गडचिरोली येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मा. महेंद्रजी ब्राह्मणवाडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा अभिमानाने फडकताना उपस्थितांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर सर्वांनी संविधानाच्या मूल्यांप्रती निष्ठा राखण्याचा व लोकशाही बळकट करण्याचा संकल्प केला.
या सोहळ्याने उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली.







