छत्तीसगडी सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन गोगांव येथे

✒️महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.27 जानेवारी) :- 

मौजा गोगांव (अडपल्ली), ता. व जि. गडचिरोली येथे नवयुवक नाट्य कला मंडळ, गोगांव यांच्या सौजन्याने आयोजित “छत्तीसगडी सांस्कृतिक कार्यक्रम” या भव्य कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मनोहर पाटील पोरेटी, मा. उपाध्यक्ष, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी उपस्थित राहून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मार्गदर्शन करताना पोरेटी यांनी सांगितले की,

“सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य, परंपरेचा जतन आणि युवकांना सकारात्मक दिशा मिळते. अशा उपक्रमांना सर्वांनी पाठबळ दिले पाहिजे.”

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती —

सतीश विधाते – नगरसेवक, गडचिरोली व शहराध्यक्ष, काँग्रेस कमिटी

अनिल कोठारे – जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी गडचिरोली

अविभाऊ वरगंटीवार

जितेंद्र मशिडवार

तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात छत्तीसगडी लोकनृत्य, गीत व सांस्कृतिक सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. संपूर्ण परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते.