राज्य महामार्गावर अंबोडा येथे गावठी पिस्तूलधारी एलसीबीच्या जाळ्यात

🔹 31 हजारांचा मुद्देमाल जप्त.

🔸महागाव पोलिस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

✒️विश्वनाथ महामुने महागाव Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.9 जून) :-

जिल्ह्यातील अवैध धंदे,अवैध शस्त्र बाळगणारे, सराईत गुन्हेगार तसेच अमली पदार्थ तस्करा विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) यवतमाळने महागांव तालुक्यांतील अंबोडा येथे धडक कारवाई करत गावठी बनावटीच्या देशी पिस्टलसह पुसदच्या एका युवकाला अटक केली. आरोपी कडून एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रधारक, गुन्हेगार व तस्करा विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी आपल्या अधिनस्त पथकांना गोपनीय माहितीच्या आधारे प्रभावी छापेमारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, 9 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागातील महागांव पोलीस ठाणे हद्दीत आरोपी शोध मोहिमेवर असतांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, अंबोडा गावा जवळील तुळजापूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गा वरील ‘अतिथी हॉटेल’ परिसरात एक इसम गावठी पिस्टलसह संशया स्पदरीत्या थांबला आहे.

माहितीची शहानिशा करत एलसीबीच्या पथकाने पंचांसह घटना स्थळी धाव घेत सापळा रचला. संशयित इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने आपले नाव रवि संतोष शिंगारे (वय 29), रा. धम्मनगर, श्रीरामपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ असे सांगितले.

त्याची अंगझडती घेतली असता कमरेला लपवून ठेवलेले गावठी बनावटीचे देशी पिस्टल (किंमत अंदाजे 30 हजार रुपये) तसेच एक जिवंत काडतूस (किंमत 1 हजार रुपये) आढळून आले. पोलिसांनी तात्काळ शस्त्र व काडतूस जप्त करून आरोपीला अटक केली. महागाव पोलीस स्टेशन येथे क्रं.320/2026 नोंद करण्यात आला. आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. कार्यवाही पथकाच सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज बांडे,पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, सहाय्यक फौजदार मुन्ना आडे, संतोष भोरगे, पोलीस हवालदार तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, पोलीस शिपाई सुनील पंडागळे, रविंद्र शिरामे यांनी सहभाग घेतला. अवैध शस्त्रधारका विरोधातील या धडक कार्यवाही मुळे परिसरात खळबळ उडाली असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा धाक अधिकच वाढल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.