✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.25 जानेवारी) :-
महागाव तालुक्यांतुन जाणाऱ्या पोहरादेवी ते पोहंडूळ या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पुसद ते पोखरी, कोनदरी मार्गाने जाणाऱ्या सर्व बसेसच्या फेऱ्या पुसद आगार प्रमुखाने बंद केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. महागाव पंचायत समितीचे माजी उपसभापती यांनी बस सेवा सुरू करण्यासाठी मागील काही दिवसापासून पुसद आगारा कडे बससेवा पूर्ववत चालू व्हावी यासाठी पाठपुरावा केला. त्या पाठपुराला अखेर यश आले. 24 जानेवारी पासून सदर बस सेवा कार्यान्वित केली असल्याचे पुसद एसटी आगार सूत्रांकडून माहिती मिळाली.
महागाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय दौलतराव नाईक यांनी या भागातील शेतकरी,व्यापारी, विद्यार्थी आणि ग्राहकांची या भागातून दैनंदिन गरजांसाठी रेलचल सुरू असते. एसटी बसफेऱ्या मागील काही दिवसापासून बंद असल्याने याचा सर्वांना फटका बसत होता. या संदर्भात गांभीर्याने लक्ष देत पुसद एसटी आगाराचे प्रभारी आगार प्रमुख विजय गडधने यांच्याकडे बससेवा पूर्ववत चालू होण्यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. पुसद आगारांनी या मार्गावरील बसफेऱ्या सुरू करण्यासाठी चाचणी सुरू केली. पाहणी दरम्यान काल 24 जानेवारी शनिवार पासून सदर बससेवा कार्यान्वित केली. या भागातून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून पोहरादेवी ते पोहंडूळ या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बांधकाम विभागाकडून युद्ध पातळीवर सुरू होते. रस्त्याचे रुंदीकरण होत असतांना या मार्गावर सुरू असलेल्या सर्व बसफेऱ्या पुसद आगार प्रमुखांनी बंद केल्या होत्या. मुळे विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले होते. तर शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी दळणवळणासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. या मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी महागाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय दौलत नाईक आगार प्रमुखाकडे सतत पाठपुरावा केला होता. सध्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे या मार्गावरून बससेवा सुरू करण्यासाठी पुसद आगारा अंतर्गत चाचणी करिता बस पाठविण्यात आली होती. परंतु पोखरी जवळ रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी तासनं तास सिमेंट टँकर उभे राहत असल्यामुळे समोर बस मार्गक्रम करेल काय याची चाचणी केल्या गेली. बसचालकाच्या अहवालानंतर या मार्गावरून नियमित बस सेवा सुरू करण्यात आली आहे. संजय दौलतराव नाईक यांच्या पाठपुरावा मुळे अखेर बससेवा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला. या परिसरातील विद्यार्थी व प्रवाशातून संजय नाईक यांनी केलेल्या कार्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
मागील अनेक दिवसांपासून पोहरादेवी ते पोहंडूळ या मार्गावरील रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम चालू होते. त्यामुळे या मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. या रस्त्याची पाहणी झाल्यानंतर बस चालका कडून अहवाल मागविण्यात आला.संजय दौलतराव नाईक हे सतत बससेवा चालू होण्यासाठी आग्रही होते. त्यांच्या पाठपुराव्या मुळे बससेवा शनिवार पासून कार्यान्वित करण्यात आली…विजय गडधने, प्रभारी एसटी आगार प्रमुख, पुसद डेपो







