✒️गुणवंत चटपकार चिमूर(Chimur तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.23 जानेवारी) :-
चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडा यात्रा नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून हरी भक्त पारायण स्नेहलताई संतोष पित्रे मुंबई यांच्या नारदीय कीर्तनाचा कार्यक्रम २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळख असलेले चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. दरवर्षी होणाऱ्या वार्षिक यात्रा महोत्सवाची सर्व भाविक भक्त मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. २०२६ चां घोडा यात्रा नवरात्री उत्सव मिती माघ शुद्ध वसंत पंचमी दिनांक २३ जानेवारी ते मिती माघ कृष्ण प्रतिपदा दिनांक २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरु राहणार असून यात्रा महोत्सव मिती माघ कृष्ण त्रोदशी दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार असून महाशिवरात्री लां यात्रा महोत्सवाची समाप्ती होईल.
दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी पहाटे श्रीहरी बालाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा व अभिषेक व महाआरती संपन्न झाली. सकाळी ९ वाजता पारंपरिक पद्धतीने डाहूले परिवाराच्या हस्ते मुंडा पूजन करण्यात आले. दिवसभर विविध विधिवत धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
व रात्री ०८:३० वाजता हरी भक्त पारायण स्नेहलताई संतोष पित्रे डोंबिवली मुंबई यांच्या सुमधुर वाणीने नारदीय कीर्तनाला सुरुवात झाली. नवरात्री उत्सवात दिनांक २५ जानेवारी रोजी रथसप्तमी २७ जानेवारी रोजी गरुड वाहन. २९ जानेवारी रोजी मारुती वाहन. व ३१ जानेवारी रोजी श्रीहरी बालाजी महाराज यांच्या प्रतिमेची अश्वृढ रथातून रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी यात्रा नवरात्री उत्सवात सहभागी होण्याचे आव्हान श्रीहरी बालाजी देवस्थान पंच कमिटी चिमूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.







