कोसमघाट ता. जि. गडचिरोली येथे ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न  

✒️महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.23 जानेवारी) :- 

कोसमघाट येथील ७/१२ कबड्डी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

 या स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभ जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या स्पर्धेत परिसरातील विविध गावांमधील संघांनी सहभाग घेतला होता.

खेळाडूंनी कोणतीही अडचण न बाळगता आपली गुणवत्ता सिद्ध करावी, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी यावेळी दिले.

खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. ग्रामीण भागातील युवकांना खेळाची संधी मिळावी व त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बक्षीस वितरणप्रसंगी विजेत्या संघांचे मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

यावेळी भारतीय युवक काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत,जिल्हाउपाध्यक्ष अनिल कोठारे, नगरसेवक न.प. गडचिरोली रमेश चौधरी,जिल्हाध्यक्ष अ. जाती. विभाग गडचिरोली रजनीकांत मोटघरे, श्रीनिवास ताडपल्लीवार, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग गडचिरोली रुपेश टिकले, नदीमभाऊ नाथानी, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलटीवर कुणाल ताजने तुलावी सर शिक्षक कोसमघाट, गाव पाटील सुधाकर वड्डे उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.