✒️महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली (दि.23 जानेवारी) :-
चामोर्शी तालुक्यातील मुरखळा (माल ) येथील वारकरी सांप्रदाय तथा बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने श्री.विठ्ठल आश्रमात २१ जानेवारी पासूनअखंड हरिनाम ज्ञानदान श्रीमद भागवत सप्ताहस सुरुवात झाली असून पहिल्या दिवसी घटस्थापना व शेतकरी आत्महत्या या सामाजिक विषयावर प्रवचन हभप धनराज महाराज नागापुरे यांनी दिले .आठवडाभर भागवत सप्ताहात भागवत प्रवचन कथा,हरिपाठ ,काकड आरती,संत तुकाराम महाराज चरित्र, संत समागम , हरिकिर्तन, आदी कार्यक्रमाचे आयोजक करण्यात आले आहे.
त्यामुळे गावातील वातावरण भक्तिमय झालेले दिसून येत आहे. भागवत सप्ताहाला युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल बारसागडे, आशिष घेर , तालुका काँग्रेस मीडिया प्रमुख विजय लाड, तालुका युवक काँग्रेस महासचिव नंदाजी रायशिडाम ,राजू नैताम ,आदित्य राऊत यांनी भेट देऊन हभप धनराज महाराज नागापुरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी वारकरी संप्रदाय मंडळाचे सचिव माया लाड, भैय्याजी बट्टे , पुष्पा नागापुरे , पत्रू कुथे बंडू गव्हारे, सविता बुरे, पुष्पा देशमुख, लता वासेकर, ढीवरू बोदलकर , जनार्दन तुंबडे, सुखदेव टिकले , मुरलीधर मंगर यासह भाविक उपस्थित होते.







