✒️महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.23 जानेवारी) :-
ग्रामपंचायत चुरमुरा, पंचायत समिती आरमोरी अंतर्गत दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी गावकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहकार्याने वनराई बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यास मदत होणार असून शेतीसाठीही याचा मोठा फायदा होणार आहे.
या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमात ग्रामपंचायतचे सरपंच श्री. ईश्वर कुळे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. अलोक रॉय, शिक्षक शेंडे सर, युवक प्रतिनिधी प्रांजल रामटेके, अनिल कोरेकर, गणेश चंदनखेडे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी श्रमदान करत या उपक्रमाला यशस्वी करून जलसंवर्धनाचा संदेश दिला. अशा उपक्रमांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळत आहे.







