✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.22 जानेवारी) :-
दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी, बुधवार मौजा जेप्रा, तालुका गडचिरोली येथे ‘नियती’ या सामाजिक नाटकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री. नेताजी गावतुरे (माजी पंचायत समिती सदस्य) उपस्थित होते. त्यांनी नाटकाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य होत असल्याचे सांगत कलाकारांचे कौतुक केले व प्रेक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून —
श्री. मनोहर पाटील जंजाळ (माजी सभापती, जेप्रा),श्रीमती शशिकला जंजाळ (सरपंच, जेप्रा),श्रीमती कुंदाताई लोणबले (उपसरपंच, जेप्रा),श्री. वामन गडपायले (पोलीस पाटील),श्रीमती सुप्रिया टेकाम (पोलीस पाटील, जेप्रा),जास्वंदा निकुरे,सुवर्णा कोडाप,श्री. धात्रक साहेब,ईश्वर बावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून नाटकाचा आस्वाद घेतला. ‘नियती’ नाटकाने सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडत प्रेक्षकांची मने जिंकली.







