चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्‍ये सर्वाधिक मतदान घेऊन विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ मधून सौ. संगिता राजेंद्र खांडेकर दणदणीत विजयी

✒️संजय तिवारी (चंद्रपूर प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.22 जानेवारी) :- 

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्‍या अधिकृत उमेदवार सौ. संगीता राजेंद्र खांडेकर विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ ओबीसी अ गटातुन निवडणुक लढविली होत्‍या. सौ. संगिता खांडेकर यांचा स्‍वभाव मनमिळावु व शांतपणे निवडणुक लढविल्‍या. मागच्‍या २०१७ च्‍या निवडणुकीत ५७४२ मते घेऊन ३२४२ मतांनी विजयी प्राप्‍त केला होता. त्‍या महानगरपालिकेत झोन सभापती पद भुषविले आहे. तसेच २०२६ च्‍या निवडणुकीत ४४३२ सर्वाधिक १९०० मतांची लिड घेऊन विजयी प्राप्‍त केला. २०२६ च्‍या निवडणुकीत चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाचे ओबीसी महिला आरक्षण घोषित झाल्‍यामुळे भाजपाने महापौर बनविण्‍याकरीता एक संधी प्राप्‍त करावी.

राजेंद्र विठोबाजी खांडेकर ही मागील ४० वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे निष्‍ठावंत कार्यकर्ते आहे. तसेच महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष आहे व कुणबी समाजाचे मागील ३० वर्षापासून अध्‍यक्ष पद भुषविले आहे. सामान्‍या वर्गात वावरत असलेला कार्यकर्त्‍यांना संधी प्राप्‍त करुन द्यावी.