✒️गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.22 जानेवारी) :-
चिमूर नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडणुका अविरोध पार पडल्या. नगर परिषदेतील सर्व विषय समित्यांवर एकमताने सभापतींची निवड करण्यात आल्याने राजकीय सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले.
बांधकाम विभागाच्या सभापतीपदी संजय नवघडे यांची निवड करण्यात आली आहे. नियोजन व विकास विभागाच्या सभापतीपदी गजानन चावरे यांची, तर महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतीपदी कविता बाणकर यांची अविरोध निवड करण्यात आली.
याचप्रमाणे स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सभापतीपदी कुणाल कावरे यांची, तर पाणीपुरवठा व जलनिस्तारण विभागाच्या सभापतीपदी दिगंबर बेंडे यांची अविरोध निवड झाली आहे.
सर्व विषय समित्यांच्या सभापतींची निवड अविरोध झाल्याने नगर परिषदेच्या आगामी विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






