✒️महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.22 जानेवारी) :-
राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आयोजित भव्य संक्रांती महोत्सव मोठ्या उत्साहात व महिलांच्या भरघोस सहभागाने पार पडला. या कार्यक्रमातून महिलांमधील सुप्त कला, आत्मविश्वास व नेतृत्वगुणांना व्यासपीठ मिळाले.
या महोत्सवात संगीत स्पर्धा, उखाणे स्पर्धा, नृत्य स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा अशा विविध मनोरंजक व प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. रवीभाऊ वासेकर (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), मा. डॉ. सौनल कोवे (महिला जिल्हाध्यक्ष), माजी जि. परिषद अध्यक्ष रविभाऊ ओलालवार, उप जिल्हा सचिव उमाताई बनसोड, विधानसभा कार्याध्यक्षा सुष्माताई येवले, OBC तालुका अध्यक्ष आशाताई मुळेवार, नवनिर्वाचित नगरसेवक संजूम सपद, माधुरी मंगर, शहर उपाध्यक्ष सखीनी, नंदू गीरवार, तसेच OBC उपाध्यक्ष किरण मंगर उपस्थित होते.
कार्यक्रमात समाजात महिलांना मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये डॉ. उत्कर्षा पवार, प्रांजली याईचवार, डॉ. विरती वैद्य (आयु. CBAMS), शीतल कोसर (मेकअप आर्टिस्ट), विश्वा फुलबांदे (सौंदर्य प्रसाधन केंद्र प्राप्त), उमा बनसोड (संपवीन बचत गट अध्यक्ष) व पल्लवी कमनकर (सिंधुताई बचत गट) यांचा समावेश होता.
सर्व सत्कारमूर्तींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून सामाजिक सहभागाला नवी दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.







