🔹सतर्क करा तुमची टू-व्हीलर ..राहुल वैरागडे
✒️महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.21 जानेवारी) :-
राष्ट्रीय महामार्ग ३५३ सी हा साकोली ते सिरोंचा असा गडचिरोली जिल्ह्यातून जाणारा एक प्रमुख मार्ग आहे.गडचिरोली ते चामोर्शी पर्यंत पुलावरती खड्ड्यांमुळे त्या जागी वापरलेला लोखंड आणि पुलातील विस्तार जोड बाहेर दिसत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.या रस्त्याने मोठ्या प्रमाणात जळवाहतूक, प्रवासी वाहतूक, टू-व्हीलर, दिवसाला शेकडो वाहने येणे जाणे करत असतात.
रस्त्याच्या पुलातील विस्तार जोड (Expansion Joint) असल्याने वाहन धारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. कधीतर वाहन ओव्हरटेक करताना अंदाज झाला नाही तर अपघाताला निमत्रण मिळते.
येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधीत विभागाने याकडे त्वरीत लक्ष देत पुलातील विस्तार जोड (Expansion Joint)भरण्याची गरज व्यक्त होत आहे असे युवा संकल्प संस्थेचे अध्यक्ष राहुल वैरागडे यांनी म्हटले आहे.







