प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचे नोडेल अधिकार आशिष मोरे IAS यांची कांचनीस भेट 

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.21 जानेवारी) :- 

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजने अंतर्गत कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, चिनोरा येथे संचालक व शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय सहसचिव वित्त विभाग भारत सरकार तथा धन धान्य कृषी योजनेचे नोडल अधिकारी आशिष मोरे (IAS) यांनी कांचनी शेतकरी कंपनीस भेट दिली. त्यावेळी कांचनीचे वतीने पुष्पगुच्छ व संविधान ग्रंथ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच चंद्रपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व आत्मा प्रकल्प अधिकारी कुसळकर यांचे स्वागत कंपनीचे संचालक बळीरामजी डोंगरकर व हिरालाल बघेले यांनी केले. केंद्र सरकारने जुलै 2025 मध्ये प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना (PMDDKY) सुरू केली आहे. ही योजना विशेषता देशातील 100 आकांक्षित जिल्ह्याच्या विकासासाठी आखण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. यात प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे.

या योजनेच्या माध्यमातून उत्पादकता वाढवणे, योजनांचे एकत्रीकरण करणे, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे, साठवणूक क्षमता वाढवणे, रोजगार निर्मिती करणे इत्यादी उद्देश समोर ठेवून ही योजना आखण्यात आली आहे. अशी माहिती आशिष मोरे यांनी दिली. यावेळी कांचनी येथील जिनिंग व प्रेसिंग युनिट, धान्य साठवणे व प्रतवारी युनिट, 3000 मेट्रिक टन गोडाऊन ला भेट देऊन सविस्तर चर्चा केली. कांचनी शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी धोबे यांनी प्रकल्पाची माहिती व संकल्पना सांगितली तर कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे यांनी येणाऱ्या अडचणी बाबत सविस्तर चर्चा केली.

   यावेळी चंद्रपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्मा प्रकल्प संचालक अरुण कुसळकर, उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिनखेडे, तालुका कृषी अधिकारी रवी राठोड, मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, उप तालुका कृषी अधिकारी आडकिने, इत्यादी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. भानूदास बोधाने कोंडाळा, चंद्रहास मोरे खेमजई व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.