प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थीचे थकीत हफ्ते तत्काळ जमा करा 

🔹झालेल्या गैर व्यवहारची चौकशी करून संबंधित दोषविरुद्ध तत्काल कारवाई करा 

🔸सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांची मागणी 

✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.20 जानेवारी) :- 

माहूर शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या शेकडो घरकुलांच्या हप्त्याची रक्कम माहूर नगरपंचायतने थकविल्याने गोरगरीब लाभार्थ्यावर कर्जापाई आत्महत्या करण्याची वेळ आल्याने सोमवारी हप्त्याची रक्कम न टाकल्यास सोमवार दि 19 पासूनच उपोषणाला शुरुवात केली आसूंन 

माहूर नगरपंचायत कडून गेल्या अनेक महिन्यापासून घरकुलाचे हप्ते टाकण्यास टाळाटाळ करण्यात येत असून घरकुल लाभार्थ्यांचे हप्त्याची रक्कम इतरत्र वळविल्याची चर्चा जोरात सुरू झाल्याने घरकुल लाभार्थ्यात घबराटीचे वातावरण पसरले असून याआधी अनेक मान्यवरांनी आंदोलने निवेदने करूनही नगरपंचायत वर कुठलाच फरक पडला नसल्याने सामाजिक कार्यकर्ते आकाश रमेश कांबळे यांनी निवेदनाद्वारे सोमवारपासून रक्कम टाकणे सुरू न केल्यास सोमवारपासूनच उपोषणाला शुरुवात केली आसूंन 

शहरात गेल्या अनेक महिन्यापासून घरकुल हफ्त्याची रक्कम पडलेली नसल्याने अनेकांनी वर्षभरापासून उघड्यावर प्लास्टिक टाकून आपला उदरनिर्वाह करत आहेत वाळू विक्री सुरू झाल्याने तात्काळ घरकुलाचे बांधकाम करणे गरजेचे असल्याने वाळू व इतर साहित्य साठी रक्कम अत्यावश्यक आहे .

त्यामुळे घरकुल हफ्त्याची रक्कम तात्काळ टाकावी अन्यथा उपोषणास शुरुवात केली आहे व तसेच सन 2018 पासून ज्या आधी घरकुल लाभाथर्यांची अनुदानची रक्कम शाशनाकडून नगर पंचायतला प्राप्त झाल्या नंतर शुधा आद्यप पर्यंत प्रलंबित आहे त्या अर्थी सदर निधीत अफरातफर व घोटाळा झाल्या आसन्याची श्याकता नाकारता येत नाही व निवेदन सादर केल्या नंतर आज पर्यंत नगर पंचायत प्रशासनाकड़ून त्या बाबत माझ्याशी कोणताही पत्र व्यवहार करण्यत आला नाही व तसेच माहूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल लाभाथर्याची थकित हफ्ते तत्काल लाभार्थियच्या खात्यात जमा करा व माहूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित दोषविरुद्ध तत्काल कारवाई करा आशी मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ता आकाश कांबळे यांनी नगर पंचायत कड़े केली आहे.