राष्ट्रीय किसान मोर्चाच्या निवेदनाची तात्काळ दखल

🔹अरुणावती प्रकल्पात कॅनल दुरुस्तीसाठी दोन JCB मशीन कार्यरत

✒️यवतमाळ(Yavtamal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

यवतमाळ(दि.5 जानेवारी) :- 

राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने अरुणावती प्रकल्पासंदर्भात दिग्रस उपविभाग, आर्णी येथील संबंधित कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनामध्ये कॅनल दुरुस्तीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या होत्या.

विशेष बाब म्हणजे निवेदन दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने तात्काळ कारवाई करत कॅनल दुरुस्तीसाठी दोन JCB मशीन पाठवल्या, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

राष्ट्रीय किसान मोर्चा ही संघटना शेतकऱ्यांच्या पाणी, शेती, हक्क आणि मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारी संघटना असून, या घटनेमुळे संघटनेच्या कार्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे आर्णी तालुका अध्यक्ष सतीश कांबळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, “शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटित लढा आवश्यक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी राष्ट्रीय किसान मोर्चामध्ये सहभागी होऊन संघटना बळकट करावी.

या यशस्वी पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.