धानोरा (सा) येथील घरकुलासह इतर कामाच्या अनियमितेची तात्काळ चौकशी करुन कार्यवाही करा

🔸अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल

✒️विश्वनाथ महामुने महागाव Mahagaon विभागीय प्रतिनिधी 

  महागाव(दि.5 जानेवारी) :- 

       उमरखेड तालुक्यांतील धानोरा (सा) येथील घरकुल योजनेमध्ये तसेच स्मशानभूमी सीसीरोड, सार्वजनिक शौचालय बांधकामा मध्ये प्रचंड गैरव्यवहार झाला असल्याने या संदर्भी तात्काळ चौकशी करुन सबंधितावर कार्यवाही करावी अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल,असा गर्भित इशारा संयुक्त पत्रकार संघ उमरखेडने दिला आहे. 

         धानोरा (सा) येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना प्रत्यक्षात लाभ न देता काही मर्जीतील लोकांना हाताशी धरून संबंधित अधिकारी कर्मचारी व ग्रामसेवक यांनी घराचे कोणतेही बांधकाम न केलेल्या लाभार्थ्यांना हात मिळवणी करून पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची रक्कम दिलेली आहे, त्याचप्रमाणे स्मशानभूमी कडे गावातून जाणारा पोहोच रस्ता हा कागदोपत्रीच दाखविण्यात आला असून प्रत्यक्षात मात्र सीसी रोड मंजूर असून सुद्धा तो करण्यात आलेला नाही, हे कमी की काय? म्हणून सार्वजनिक शौचालयाचे काम हे तेथील सरपंच व ग्रामसेविका हे स्वतःच करत असून सदर बांधकाम इस्टिमेट मध्ये दिलेल्या मापनानुसार न करता थातूरमातूर काम चलाऊ पद्धतीने काम सुरू आहे गोरगरीब जनतेसाठी शासनाकडून येणाऱ्या निधीचा येथे अपहार होतो आहे. कोणी सामान्य नागरिकानी विचारणा केल्यास तेथील ग्रामसेविका ह्या त्यांना कोणत्याही गुन्ह्यात अडकवतो अशा त्या त्यांच्या मर्जीतील व्यक्तींकडून धमक्या देतात या सर्व बाबतीत संबंधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी ,आरइची यांच्या संगणमतातून शासनाच्या निधीचा गैरवापर करण्यात आल्याने त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी या वरील आशयाचे निवेदन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प यवतमाळ यांना देण्यात आले आहे तात्काळ चौकशी होऊन कार्यवाही न झाल्यास संयुक्त पत्रकार संघ उमरखेड तर्फे उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आला असल्याचे समजते.