शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी चेटलेवाड

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि.25 डिसेंबर) :- 

महागाव तालुक्यातील राहुर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 24 डिसेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. या वेळी शिवाजीराव काळे पाटील यांच्या नेतृत्वात रामू चेटलेवाड यांची समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. 

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राहूर येथे बुधवारी पालक सभा घेण्यात आली. होऊ घातलेल्या पालक सभेसाठी उपसरपंच शिवाजी गोपनवाड, राजाभाऊ कदम ग्रा.पं. सदस्य,सुशील तोरणपवार पोलीस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष गजानन तोरणपवार यांच्या उपस्थितीत ही समिती नेमण्यात आली. यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शाळा व्यवस्थापन समिती मध्ये रामू मा. चेटलेवाड यांची अध्यक्ष म्हणून तर संदीप दामोदर जाधव यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

समितीमध्ये सिमा प्रवीण भांडवले, गजानन तोरणपवार,अस्मिता गोपनवाड,अनंता माणिकवाड,अनिता चप्पलवाड,प्रियांका पवारवाड, कविता काळे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. निलेश राठोड यांची समितीमध्ये शिक्षण तज्ञ या पदी निवड झाली. कु.प्रेक्षा तोरणपवार,मयंक चव्हाण यांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. तर शेषेराव देशमुख यांची शिक्षक प्रतिनिधी म्हणून या समितीमध्ये निवड करण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समितीची निवड अतिशय उत्साहात गठीत करण्यात आली. या प्रसंगी सभेचे कामकाज मुख्याध्यापक मयूरकुमार सायरे, राजकुमार टिपराळे, दयानंद विभुते, शिवाजी मस्के (सहाय्यक शिक्षक) यांनी पाहिले. या प्रसंगी पालक वर्ग आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली.