करंजखेडमध्ये बौद्ध समाज बांधवांना न्याय कधी मिळणार

🔹तीन आठवड्यापासून चौकशी समिती थंड बसत्यात

🔸जिला स्तरीय चौकसी समिती मार्फत प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि.22 डिसेंबर) :- 

करंजखेड येथे बौद्ध समाजाच्या पिढ्या न् पिढ्या ताब्यात असलेल्या सामुदायिक सभागृहासाठी राखीव असलेल्या जागेवर बेकायदेशीररीत्या कब्जा करण्यासाठी तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून प्रोसिडिंग रजिस्टर,नमुना-8 आणि सभा ठरावात जाणीवपूर्वक खोडतोड केले असल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला.या खळबळ जनक प्रकरामुळे समाज बांधवांनी 1डिसेंबर 2025 रोजी महागाव गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली आहे. तीन आठवड्याचा कालावधी लोटला आहे, परंतु ना चौकशी समिती गावात आली, ना कार्यवाही करण्यात आली. आज पावेतो चौकशी समिती थंड बसत्यात गुंडाळली आहे. 

  1 डिसेंबर डिसेंबर रोजी करंजखेड येथील बौद्धसमाज बांधवांनी महागावचे गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम यांच्या कडे तशा आशयाची तक्रार दाखल केली आहे. 

केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी पंचायत समिती महागाव यांच्याशी तक्रारकर्त्यांनी विचारपूस केली असता त्यांनी चौकशी समिती नेमली असल्याचे तोंडी सांगितले. चौकशी साठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष सहाय्यक गटविकास अधिकारी विजय खिल्लारे हे असुन त्यांच्या सोबत विस्तार अधिकारी चव्हाण आणि देशमुख असल्याचे सांगितले. परंतु मागील 20 ते 22 दिवसा पासून चौकशी समिती करंजखेड गावात आली नाही. बौद्ध समाज बांधवांना आज पावेतो चौकशी समिती मार्फत पत्र व्यवहार सुद्धा झाला नाही. त्यामुळे समिती नेमली आहे किंवा बनवा बनवी होत आहे? या बाबत स्पष्टता होत नसल्याने तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.मागील तीन आठवड्या पासून तक्रारीचा निपटारा होत नसल्याने तक्रारदार संभ्रमात पडले आहेत.चौकशी समिती मधील विस्तार अधिकारी चव्हाण आणि तक्रारीत नमूद केलेले तत्कालीन ग्रामसेवक यांच्यातील सुमधुर संबंध तालुक्याला सर्वश्रुत आहेत. त्यामुळे आम्हाला निरपेक्ष न्याय मिळेल की नाही या बाबत शाश्वती दिसत नसल्यामुळे ही चौकशी समिती रद्द करून जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमण्यात येऊन प्रकरणाची संबंधित समिती मार्फत नि:पक्ष चौकशी करून आम्हा समाज बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी करंजखेड येथील बौद्ध समाज बांधवांनी केली आहे.