✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.22 डिसेंबर) :-
सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवणारे आणि सहकार क्षेत्रात भरीव योगदान असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. सिताराम ठाकरे पाटील यांची ओळख आहे.करंजखेड येथील माजी सरपंच तथा सहकार महर्षी म्हणून ओळख असलेले पाटीलांची यवतमाळ जील्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रतिनिधीपदी निवड झाली, ही करंजखेड गावासाठी अभिमानाची बाब आहे.
प्रा.सिताराम ठाकरे यांचा सहकार क्षेत्रातील विविध विकास कामांच्या अनुभवातून जनसामान्यांसाठी सेवाभावी वृत्तीचा जनसामान्यांना निश्चितच लाभ होणार आहे.
सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे प्रा. ठाकरे गरजवंंताच्या हाकेला ओ देऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत पुढाकार घेतात. जनसामान्यांचे नेते प्रा. सिताराम ठाकरे पाटील यांची झालेली निवड ही त्यांच्या कार्याची पावती आहे.सहकार क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान पाहता करंजखेड विविध सेवा सहकारी सोसायटीद्वारे एकमुखाने झालेली निवड ही प्रा. सिताराम ठाकरे पाटील यांच्या प्रामाणिक, सेवाभावी वृत्तीची पावती आहे. करंजखेड परिसराच्या विकासासाठी ते नक्कीच प्रभावी भूमिका बजावतील असा विश्वास त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे. त्यांच्या झालेल्या निवडीला यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाऊरावजी लक्ष्मणराव चौधरी साहेब यांचे सह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यातून त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे.







