माहूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी ‘एक वही एक पेन’ वाटप करून महामानवास अभिवादन 

🔸आंबेडकराईट युथ फोरमचा सलग 12 वर्षांपासूनचा अविरत स्तुत्य उपक्रम

✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर (दि.6 डिसेंबर):- 

आंबेडकराईट युथ फोरम, माहुर यांच्या तर्फे आयोजित आज दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘एक वही एक पेन’ नामक उपक्रम राबविण्यात येऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. 

महामानवांच्या विचारांना पुढे न्यायचे असेल तर एक वही एक पेन सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून महामानवांनी आपल्याला शासनकर्ती जमात बनविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्याचे चीज हे फक्त मेणबत्ती प्रज्वलित करून होणार नाही तर शिक्षणाची विविध शिखरे पादाक्रांत करून साध्य होणार आहे. त्याकरिता पेन आणि वहीची उपयुक्तता व महत्व लक्षात घेऊन त्यादिशेने प्रयत्न आणि अभ्यास करणे गरजेचे आहे असे मत आंबेडकराईट युथ फोरमचे राहुल भगत यांनी व्यक्त केले.

       या कार्यक्रमात नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नगरसेवक गोपु महामुने, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, संयोजक राहुल सावित्रीबाई पुंडलिकराव भगत,डॉ. सत्यम प्रकाश गायकवाड,प्रतीक कांबळे, कनिष्क वानखेडे, राहुल नरवाडे,अनिल कांबळे, सिद्धार्थ भालेराव, मनोज कीर्तने, पत्रकार पद्माताई गिर्हे, जयंत गिर्हे, सोनू तेल्हारे, आकाश कांबळे, गोविंदराव मगरे, राजू मगरे एकनाथ मानकर,हर्षवर्धन भवरे, कैलास कांबळे, रफिकभाई, अहमद कुरेशी, रामराव खडसे,आदित्य खंदारे, अरविंद कांबळे, सुभाष भगत यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, सुजाण नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभाग घेतला.