🔸आंबेडकरी विचारधारेच्या अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.6 डिसेंबर) :-
महागाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तैलचित्र परिसरात बाबासाहेबांना महापरिनिर्वाणदिनाचे औचित्य साधत मोठ्या श्रद्धेने विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांनी डॉ.बाबासाहेब आणि छत्रपती शिवराय यांच्या स्मारकास माल्यअर्पण करून मानवंदना दिली.
आजच्या दिवशी भारतभरात लाखोंच्या संख्येने चैत्यभूमी दादर मुंबई येथे जमा होतात. चैत्यभूमी स्तुपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात. महागाव येथील समाज बांधवांनी क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी प्रा शरदचंद्र डोंगरे, ललित इंगोले,महेंद्र कावळे,नगरसेविका जयश्री नरवाडे यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व विशद करत त्यांच्या आंदोलनशील, क्रांतिकारी आणि मानवतावादी कार्यावर प्रकाश टाकला. समानता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश आज अधिक जोमानं आचरणात आणण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त करताना स्पष्ट केले.
कार्यक्रमास रामराव पाटील नरवाडे, संजय नरवाडे, डॉ.नारायण पठाडे (पुसद),भीमराव गायकवाड, तातेराव हनवते, रमेश सांगडे,जयंत चौधरी, धम्मानंद कावळे, अमोल राजवाडे, प्रवीण कावळे, मुन्ना ठमके, गौतम पवार, विश्वनाथ महामुने, दिलीप हनवते, मुरादे शंकर बावणे, मंचकराव खंदारे, गजानन पाईकराव, जयश्री इंगोले, छाया खंदारे, विभा तायवाडे, करुण नारायण शिरबिडे, दीक्षा शिरबिडे, वैशाली सांगडे, लता राऊत, कशी धुळधुळे, चंदा पाईकराव, मिनी बाई कावळे, ललिता खंडारे, बेबाबाई कवळे, किशन पाईकराव, पंजाब सरदार, अरुण खंदारे, राजू सावतकर (तरोडा), सुनील मनवर यांच्यासह अनेक उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शांत, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. महापरिनिर्वाण दिना निमित्त बाबासाहेबांच्या विचारांची उजळणी करत समाजात बंधुता व समतेचा संदेश पोहोचवण्याचा आयोजकांनी प्रयत्न केला. कार्यक्रमाची सांगता प्रार्थना व जयभीमच्या घोषणांनी झाली.







