🔹राष्ट्रसंत द भ प साईनाथ महाराज वसमतकर यांचे सह भाविक भक्तांनी राबविले आयटीआय मध्ये स्वच्छता अभियान
🔸शिक्षक विद्यार्थी सह भाविकांना केले मार्गदर्शन
✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.30 नोव्हेंबर) :-
महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत तथा ब्रँड अँबेसिडर राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांच्याकडे महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व आयटीआय मध्ये स्वच्छता अभियान राबवून मार्गदर्शन करण्यासंबंधी आदेश काढल्याने राज्यभरातील आयटीआय मध्ये साईनाथ महाराज वसमतकर हे प्रबोधन आणि मार्गदर्शन करत असून त्या अंतर्गत माहूर शहरातील आयटीआय मध्ये सर्व शिक्षक विद्यार्थी भाविक भक्ता समवेत स्वच्छता अभियान राबवून विद्यार्थ्यांना दि 28 रोजी मार्गदर्शन करण्यात आले.
राज्याचे स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर यांच्याकडून दररोज वेगवेगळ्या शहरातील आयटीआय मध्ये जाऊन स्वच्छता अभियान सह विद्यार्थ्यांना जीवनात उपयोगी पडणारे मार्गदर्शन करण्यात येत असून दत्त जयंती निमित्त श्री आनंद दत्त धाम आश्रम येथे दत्त नाम सप्ताह निमित्त सात दिवस मुक्कामी असल्याने आनंद दत्तधाम आश्रम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत शहरातील आयटीआय मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन स्वच्छता अभियानाचे महत्त्व आणि शिक्षणाची गोडी शिकण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने करण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच आयटीआय माहूर मध्ये सुरू असलेले पेंटर इलेक्ट्रिशियन फिटर ड्रेस मेकिंग कोपा या ट्रेड बद्दलही मार्गदर्शन केले तसेच एम एम व्ही या प्रस्तावित ट्रेड बद्दल शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले यावेळी आयटीआय चे प्राचार्य फारुकी ए वासे यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशिका पोतदार ए एन यांनी सर्व ट्रेड बद्दल माहिती दिली.
यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त तसेच आयटीआयचे निदेशक रामटेके ए एल कनिष्ठ लिपिक बुटले पी एल शिल्पनिदेशक डाकोरे एस एस जगदाळे आर के चीरडे एन बी चव्हाण यु डी मानकर व्ही डी महेश मेकलवार सौ रागिणी खडसे सौ कुसुम मेसेकर पवार व्ही के वॉचमन यांचे सह श्री आनंद दत्त धाम आश्रम चे संचालक मंडळ उपस्थित होते कार्यक्रमाचे कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन शिल्प निदेशक आर के जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्र गटनिदेशिका ए एन पोतदार यांनी मानले.







