🔸मराठा व मुस्लिम मतेच ठरणार निर्णायक
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.30 नोव्हेंबर) :-
सध्या उमरखेड नगरपरिषदेचीं निवडणूक सुरू असून प्रचाराला मात्र आता वेग आला आहे. भाजपाचे जिल्हा समन्वयक, तीन आमदार घडविणारे नितीन भुतडा यांच्या सौभाग्यवती निधी भुतडा या नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांनी प्रचारात मोठी मुसंडी घेतली असली तरीही नगर परिषदे समोरील भारत पेट्रोल पंपासमोर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या जागेचा प्रश्न अध्याप मार्गी लागला नाही. या आधी नगरपरिषदे वर भाजपाची सत्ता होती, परंतु सदर जागेचा तिढा सुटला नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची आता या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागल्याची चर्चा ऐकू येत आहे.
उमरखेड नगरपरिषद जिल्ह्यात मोठी नगरपरिषद म्हणून ओळखल्या जाते. या नगरपरिषदेवर यापूर्वी भाजपाची सत्ता होती. सत्तेच्या कार्य काळात शहररात विविध विकास कामे मार्गी लावण्यात आली. स्वतः तत्कलीन आमदार नामदेव ससाणे हे नगरपरिषदेचे अध्यक्ष होते. तरी ही भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा प्रश्न पूर्णतः मार्गी लागला नसल्याने मराठा मतदारांचा कौल या वेळी होऊ घातलेल्या निवडणुकीत कोणाच्या बाजूने झुकणार हे महत्त्वाचा ठरणार आहे. एम.आय.एम. पक्षाने दिलेला उमेदवार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा उमरखेड शहरात नागरिकांतून होतांना ऐकू येत आहे. त्या मुळे राजकीय समीकरण बिघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नितीन भुतडा यांनी मुस्लिम समाजाच्या अनेक कब्रस्तानला निधी दिल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्या कडे मुस्लिम समाजाची मते वळतात का? हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. या वेळची निवडणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेचा तिढा सुटला नसल्यामुळे भाजपला जड जाणार असल्याची शक्यता असली तरी मात्र भाजपच्या निधी भुतडा व काँग्रेस प्रणित जनशक्ती पॅनलच्या तेजश्री जैन या दोनच उमेदवारांत मुख्य लढत होत असल्याचे चित्र आहे. या वेळी निश्चितच भारतीय जनता पक्षासाठी मराठा आणि मुस्लिम मतदाराचे मतदान निर्णायक ठरणार आहेत. सध्याची निवडणूक ही अटीतटीची होत असून अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या बाबत सोमवारला चित्र स्पष्ट होणार आहे एवढे मात्र खरे!







