एक नंबर वर नाव आणण्यासाठी निधी चंचल केली

🔸निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेत अँड .जाधव यांचा पत्रकार परिषदेत आरोप

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागिय प्रतिनिधी)     

महागाव(दि.30 नोव्हेंबर) :- 

  उमेदवार निश्चित झाल्यानंतर डमी पत्रिकेवर अथवा मशीनवर सर्वप्रथम नाव आणण्यासाठी भाजपा उमेदवार प्रतिनिधीने निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने मराठी मुळाक्षरा नुसार ईव्हीएम मशीन मध्ये क्र. एकवर नाव आणण्यासाठी चंचल (निधी )भुतडा असे ऑफलाईन प्रतिज्ञा पत्र सादर केल्याचे सांगून उमेदवारांच्या आक्षेपाला उडवा उडविची उत्तरे दिली. व इतर नगराध्यक्ष पदाच्या इतर उमेदवारांवर अन्याय केला असा आरोप शिवसेना (शिंदे ) पक्षाचे शहर प्रमुख अँड. संजीव कुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला .

      उमरखेड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या पाच उमेदवारां पैकी ईव्हीएम मशीनवर सर्वप्रथम क्र. एकवर नाव आणण्यासाठी भाजपा नेत्याच्या प्रभावा खाली येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एबी फॉर्म जोडून ऑनलाइन केलेल्या उमेदवारी अर्जावर निधी नितीन भुतडा असा उल्लेख असतांना दुसरा ऑफलाइन आलेल्या उमेदवारी अर्जावर चंचल ( निधी ) नितीन भुतडा असा उल्लेख असल्यामुळे आम्ही मराठी मुळाक्षरा नुसार भाजपाच्या उमेदवाराला मतपत्रिकेवर क्र. 1 वर ठेवले असे सांगून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विरोधकांचे आक्षेप फेटाळून लावले. वास्तविक पाहता मराठी मुळाक्षरा नुसार शिवसेनेच्या शारदा संजीव कुमार जाधव यांना मतपत्रिकेवर क्र.1 मिळायला पाहिजे होता. एका उमेदवाराचा एकच अर्ज स्विकारायला पाहिजे, असतांना महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा वर्तनाचे पहिलेच उदाहरण असून निवडणूक निर्णय अधिकारी हे भाजपा नेत्यांच्या प्रभावा खाली काम करीत असल्याचा स्पष्ट आरोप ॲड. संजय जाधव यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची बदली करावी व निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी या बाबत तक्रार करून सुद्धा वरिष्ठांकडून दखल झाली नसल्याचे शेवटी अँड. संजीव कुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले .या वेळी ज्येष्ठ शिवसेना नेते चितांगराव कदम सर, अनिल नरवाडे, कैलास कदम,रमेश चव्हाण ,सपना चौधरी ,आदींची उपस्थिती होती .