सारिका आव्हाडांच्या उमेदवारीसाठी गुंज जिल्हा परिषद सर्कल मधून जम्बो डेपोटेशन

🔸भाजपा निवडणूक प्रभारी नितीन भुतडा यांची घेतली भेट

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि.13 नोव्हेंबर) :-

नुकत्याच काही दिवसात होणार असलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक जसजशी जवळ येत आहे.तसतसे जिल्हा परिषद सर्कल मधून नवीन युवा चेहरे निवडणूक लढण्यासाठी कंबर कसून पुढे येत आहेत.सध्या गुंज जिल्हा परिषद सर्कल मध्ये उमेदवारीची मोठ्या प्रमाणात चुरस वाढली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या अर्धांगिनी सौ.सारिका सुरेश आव्हाड ह्या गुंज जिल्हा परिषद सर्कल करिता उमेदवारी करिता प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या उमेदवारी साठी गुंज जिल्हा परिषद सर्कल मधून 9 नोव्हेंबर रोजी तब्बल तीस वाहनाचा ताफा थेट उमरखेड मुख्यालयी भाजपचे निवडणूक प्रभारी नितीन भुतडा यांच्या घरी पोहोचला. दरम्यान या ताफ्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी सारिका आव्हाड यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी केली.नितीन भुतडा यांनी गुंज जिल्हा परिषद सर्कल मधून आलेल्या आणि सुरेश आव्हाडांना मानणाऱ्या असंख्य हितचिंतक कार्यकर्त्या सोबत संवाद साधला.

   या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी नितीन भुतडा म्हणाले की, एवढे जम्बो डेपोटेशन सोबत असेल तर आपल्याला गुंज जिल्हा परिषद सर्कलची निवडणूक खरोखरच सोपी जाईल.आपल्या भागातील सर्व्हे बघून या संदर्भात योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्या जाईल असे स्पष्ट केले.सुरेश आव्हाड हे युवा सामाजिक कार्यकर्ते असून कुठल्या अडचणीच्या काळात सामान्यांच्या हाकेला ओ देऊन त्याचे काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्कल मध्ये ओळख निर्माण झाली आहे. यावेळी सुरेश आव्हाड या ताफ्यात सुद्धा सहभागी नव्हते. त्यामुळे स्वतः उमेदवारी साठी आग्रही न राहता सर्कल मधील मायबाप मतदारच यांच्या सौभाग्यवतींच्या उमेदवारी साठी नितीन भुतडा यांच्याकडे मागणी करीत असल्याने सारिका आव्हाड यांना भाजपच्या वतीने उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.