महागाव शहरात बिरसा मुंडा जयंती

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.16 नोव्हेंबर) :- 

महागांव शहरात शनिवारी बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत समाज बांधवाकडून 150 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहर प्रमुख तथा महागाव नगरपंचायतीचे गटनेचे शैलेश कोपरकर, बिरसा संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव डाखोरे, सामाजिक कार्यकर्ते बंडू पाटील राऊत, पत्रकार विश्वनाथ महामुने, फोपसे सर यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्रास अभिवादन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अर्चना भरकडे मॅडम, तुकाराम भिसे साहेब, निर्मला सोयाम, दत्ता इंगळे, संतोष गंधारे याच्या सह अनेक समाज बांधवांनी उत्सव मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदविला. या वेळी निलेश पाटील,सय्यद मुदसिर यांचे सह बिरसा मुंडा संघटनेचे तालुक्यातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

      बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महागाव शहरातून जुने बस स्थानक परिसरातील भगवान बिरसा मुंडा तैलचित्रास अभिवादन करून समाज बांधवांची रॅली महागाव शहरातून मुख्य मार्गाने बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण केले. पुढे मिरवणूक जत्था हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या तैलचित्र अभिवादन करण्यासाठी मार्गस्थ झाला.तालुक्यांतून अनेक गाव, खेड्यातून आदिवासी समाज बांधवांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रम मध्ये उस्फूर्त सहभाग नोंदविला.