नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचांदूरात शिवसेनेमध्ये (शिंदे सेना) जोरदार इन्कमिंग

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.9 नोव्हेंबर) :- 

       आगामी होऊ घातलेल्या नगरपरिषद 2025 निवडणुकीत कोणाचे पारडे जळ आणि कुणाचे हलके अशा हालचालीला वेग असताना गडचांदुरात शिवसेना (शिंदे सेना) मध्ये जोरदार इनकमिंग पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वच पक्षाचे कार्यकर्ते ज्यांनी शिंदे सेनेची साथ घेत प्रवेश घेतला आहे .

             राजुरा विधानसभेत ढाण्या वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री धनु भाऊ छाजेड यांनी गेल्या दहा वर्षात राजकीय संन्यास घेतला होता पण आता राज्याची उपमुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे यांच्या कर्तुत्वावर नेतृत्वावर विश्वास ठेवून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री बंडूभाऊ हजारे यांच्यावर विश्वास ठेवून शिवबंधन बांधून घेतले. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व असणारे सचिन भाऊ गुरणुले तसेच शिवसेना उभाटाचे सुधाकर भाऊ ताजणे ,शांताराम भाऊ कुरसंगे, अनिल भाऊ सिडाम अशा विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. येणाऱ्या काही दिवसात खूप मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे धनु भाऊ छाजेड यांचे म्हणणं आहे.

             यावेळी कोरपणा तालुक्याचे तालुकाप्रमुख राकेश भाऊ राठोड गडचांदूर चे शहर प्रमुख विकी राठोड युवा सेना तालुकाप्रमुख अरविंद गोरे अआदी कार्यकर्ते उपस्थित होते.