🔹स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.10 नोव्हेंबर) :-
मेडिकल चालकाला रस्त्यात अडवुन लुटमार करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत असताना ताब्यात घेतलेल्या दोन संशयित आरोपींनी आपल्या साथीदारांसह वाटमारी व दरोडा घातल्याची कबुली देताच पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवुन या उर्वरित तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्याआहेत.
महागाव तालुक्यातील खडका येथे दिवाळीच्या पुर्वी रात्रीच्या अंधारात मेडिकल चालकाला अडवून धारदार शस्त्राच्या जोरावर लुटण्यात आल्याची घटना घडली होती.याच गुन्ह्याचा शोध घेण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला असतात.
त्यांना सदर गुन्हा वडद येथील पवन सुरेश पवार व हनुमान सुभाष धनवे यांनी आपल्या साथीदारांसह केल्याची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हनुमान धनवे हा ऊसतोडीच्या कामासाठी गेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्याला नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलिस स्टेशनच्या हद्दीतून ताब्यात घेऊन विचार पुस केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होता.त्यामुळे पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपले साथीदार पवन सुरेश पवार , तुषार ऊर्फ विठ्ठल बाळू भांगे,जगदीश गणेश पवार , मोन्टी उर्फ चेतन मनीष चव्हाण सर्व रा. वडद ता. महागाव यांच्यासह दरोडा व जबरी चोरी केल्याची माहिती दिली.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पवन सुरेश पवार,तुषार ऊर्फ विठ्ठल बाळु भांगे,जगदीश गणेश पवार यांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम ₹ १,६५,३००/-, गुन्ह्यात वापरलेली एक चाकू, एक पिस्तूल (₹ ३०,०००/-), एक मोबाईल (₹ २०,०००/-) आणि दरोडा टाकण्यासाठी वापरलेली एक मोटार सायकल (₹ ४५,०००/-) असा एकुण ₹ २,६५,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थागुशा पोलिस निरीक्षक सतीश चवरे, यांच्या मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, उपपोनि. शरद लोहकरे,पथकातील कर्मचारी मुन्ना आडे,संतोष भोरगे,तेजाब रणखांब,सुभाष जाधव,कुणाल मुंडोकार,रमेश राठोड,सुनील पंडागळे,रविंद्र श्रीरामे,राजेश जाधव यांनी केली आहे.







