🔹काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळेच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने घेतली दखल
राजकीय पक्ष सामाजिक संघटनांकडून समाधान व्यक्त
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.18 ऑक्टोबर) :-
राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रारुप मतदार याद्या 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेआहे. या याद्यावर आक्षेप व हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर आयोगाने निश्चित केली होती. मात्र अक्षेप व हरकतीसाठी अवघ्या पाचच दिवसाचा कालावधी दिल्या गेल्याने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांनी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती, त्यामुळे निवडणूक आयोगाचे सचिवांनी दखल घेत 13 ऑक्टोबरला सुधारित आदेश जारी करून आक्षेपासाठी चार दिवसाची मुद्दत वाढ दिली.
राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतच्या सदस्य व अध्यक्ष पदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. निवडणूक आयोगाने 08 ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख जाहीर केली. 13 ऑक्टोबर पर्यंत त्यावर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती. मात्र आयोगाच्या या कार्यक्रमाचे आक्षेपासाठी केवळ पाचच दिवसांचा कालावधी दिल्याने काँग्रेस प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी निवडणूक आयोगाला तशा प्रकारची लेखी तक्रार दिली. अल्पकाळातील प्रत्येक भागातील मतदार योजनांचा बारकाईने अभ्यास करून त्रुटी शोधणे व हरकती तयार करणे, त्या हरकती सूचना निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करणे अवघड ठरत असल्याने नमूद केले होते. नागरिकासह सामाजिक संस्था राजकीय पक्षाचे प्रतिनिधींना आक्षेप
दाखल करायला अत्या अल्प वेळ मिळाल्याचे साहेबराव कांबळे यांनी तक्रारीत नमूद केले होते.पूर्वी आक्षेपासाठी 15 ते 30 दिवसांचा कालावधी दिल्या जायचा, मात्र पाचच दिवसाचा कालावधी मिळाल्याने निवडणूक विभागाचे सचिव सुरेश काकांनी यांच्याशी थेट साहेबरावजी कांबळे यांनी संवाद सादर 13 ऑक्टोबरला राज्यातील 247 नगरपालिका, नगरपरिषदेच्या व 42 सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. सुधारित आदेशाने अक्षरासाठी 17 ऑक्टोबर पर्यंत अतिरिक्त चार दिवसाचा वेळ मिळाला. यवतमाळ जिल्ह्याचा राज्यभर फायदा झाला. या मुद्दत वाढीमुळे सर्वत्र राजकीय पक्ष सामाजिक संघटना व नागरिकांनी समाधान व्यक्त करत साहेबराव कांबळे यांचे आभार व्यक्त केले.







