🔹वाई बा. गटात प्रा. रवी राठोड तर डॉ. अर्जुन पवार वानोळा जि.प. गटाचे उमेदवार
✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.19 ऑक्टोबर) :- समनक जनता पार्टी जि.प.प.स.च्या सार्वत्रिक निवडणुकीत समनक जनता पार्टी संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असून वाई बा. जि.प. गटात प्रा. रवी राठोड व वानोळा जि.प. गटात डॉ. अर्जुन पवार असे सुशिक्षित व तरूण तडफदार उमेदवार उभे करणार असून चारही पं.स. गणात सुद्धा लढाऊ व अभ्यासू कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार असल्याचे समनक जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा. रवी राठोड यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षापासून माहूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक कष्टकरी शेतमजूर व शेतकरी यांच्या विविध समस्या अडचणी सोडविण्यासाठी समनक जनता पार्टीने विविध आंदोलने करून पाठपुरावा केला, तालुक्यातील सर्वच जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जनसेवेचा अंगीकारलेला वसा जोपासत सर्वसामान्य वंचित व उपेक्षित नागरिकांच्या ह्रदयस्थानी जाऊन बसल्याने माहूर तालुक्यातील दोन्ही जी.प. गटातून समनक जनता पार्टी तर्फे आगामी निवडणुकीत उमेदवार उभे करावे असा आग्रह करण्यात आला. वाई बा. जि.प. गटासाठी प्रा. रवी राठोड व वानोळा जि.प. गटासाठी डॉ. अर्जुन पवार यांच्या नावाला मतदारांकडून सर्वाधिक पसंती येत आहे.
पिक कर्जमाफी साठी व शेतकऱ्यांची कर्जाची सक्तीची कर्ज माफीची वसुली थांबवावी व शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे होल्ड काढण्यासाठी केलेले आंदोलनासह विविध आंदोलनाने तालुकाध्यक्ष प्रा. रवी राठोड यांची तालुक्यातील सर्वसामन्य नागरीका पर्यत ओळख निर्माण झाली आहे. तसेच विमा व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कुटुंबाना आर्थिक व्यवस्थापनाचे नियोजन करून दिल्याने तालुक्यातील विविध जाती धर्माच्या नागरिकांच्या घरापर्यत त्यांचे संबध निर्माण झालेले आहेत. तर दत्तमांजरी ग्रामपंचायत चे गेल्या 6 वर्षापासून प्रतिनिधित्व करणारे डॉ. अर्जुन पवार यांनी दत्तमांजरी ग्रामपंचायत अंतर्गत अनेक विकास योजना प्रभावीपणे राबवून आपल्या राजकीय प्रगल्भतेची चुणूक दाखविली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुकाभर त्यांची अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून ओळख आहे.
गोर सेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून प्रा. संदेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात तालुकाभर समाजकाकार्य केलेले असल्याने दोन्ही चेहरे तालुकाभर सुपरिचित आहे. त्यामुळे आगामी जि. प. पं.स. निवडणुकीत लोक आग्रहास्तव समनक जनता पार्टी उमेदवार उभे करणार असून १०० % यश मिळवणार असल्याचा विश्वास तालुकाध्यक्ष प्रा. रवी राठोड यांनी व्यक्त केला आहे.







