गावकरी धडकले नवेगाव बफर गेट वर. गेट पाडला बंद 

✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर(दि.14 ऑक्टोबर) :- 

      चिमूर तालुक्यातील बरडघाट. पांढरपौणी. झारी. येथील नागरिक मागील अनेक वर्षांपासून वन विभाग बफर झोन यांच्याकडे विविध समस्यावर वारंवार निवेदनाद्वारे लक्ष वेधले मात्र वन विभाग यांच्या मागणी कडे काना डोळा करीत असल्याचा आरोप बरडघाट. पांढरपौणी. झारी येथील नागरिकांनी केला होता.

       आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी नागरिकांनी नवेगाव गेट वर मोर्चा काढला. पारंपरिक वाद्याच्या गजरात शांततेत मोर्चा काढला. विविध मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा नवेगाव गेट वर पोहचला. मोर्चातील नागरिकांनी नवेगाव सफारी गेट बंद केला. नागरिकांच्या मोर्चाला सहाय्यक वन स्वरक्षक साई तन्मय डूबे यांनी मोर्चाला समोर जात आंदोलन करूनसोबत चर्चा केल्या परंतु मागण्या शासन स्तरावरील असल्याने शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले. परंतु नागरी वरिष्ट अधिकाऱ्याच्या येण्याच्या मागणीवर अडून बसले अखेर पाच तासानंतर बफर झोन उपसंचालक कुशाग्र पाठक आंदोलन स्थळी आले व आंदोलकांशी मागण्यांवर चर्चा करून शासन स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सहाय्यक वनरक्षक साई तन्मय डूबे. बफर वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत. प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊलकर उपस्थित होते.

      मोर्चयाची तीव्रता लक्ष्यात घेता पोलिस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.