✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.11 ऑक्टोबर) :-
राज्यातील अलीकडील पूरस्थितीमुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी चिमूर तालुक्यातील महिला बचत गट व बालाजी जिनिंग एंड प्रेसिंग इंडस्ट्रीने पुढाकार घेतला आहे.
रिसर्च बहुउद्देशीय संस्था वडाळा चिमूर च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या आदिवासी ग्रामीण महिला बचत गट मदनापूर. सावित्रीबाई फुले महिला बचत गट मदनापूर. मुक्ताई महिला आदिवासी बचत गट मदनापूर. या तिन्ही बचत गटाच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹१,११,००० इतक्या रकमेचा धनादेश सुपूर्द केला. तसेच बालाजी जिनिंग एंड प्रेसिंग इंडस्ट्री रेंगाबोडी १.११.१११ रुपये यांनी हा धनादेश आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला.
या वेळी सपना जांभूळे. मीना सोनवाणे. वैशाली कूळमेथें. सुनीता नन्नावरे. रजनी भरडे. लता भरडे तसेच श्रेयस लाखे व तिन्ही बचत गटांच्या सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून महिलांनी दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी सर्वत्र कौतुकास्पद ठरली आहे.







