✒️ सौ . सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा(दि.10 ऑक्टोबर) :-
ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी, राजुरा यांच्या वतीने संचालित ॲड. यादवराव धोटे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे.महाविद्यालयातील १२ वी कला शाखेचा विद्यार्थी समीर चांदेकर याने कॅरम स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. समीरने राजुरा तालुक्यातून जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्तरावर प्रवेश मिळविला.
त्यानंतर विभागीय स्तरावरही दुसरा क्रमांक मिळवून त्याने राज्यस्तरावर आपले स्थान निश्चित केले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.तसेच, १२ वी विज्ञान शाखेतील दर्शील तुमडेकर याने जिल्हास्तरावर सहावा क्रमांक मिळवत विभागीय स्तरावर प्रवेश मिळविला असून, पार्थ गणवीर या विद्यार्थ्याने जिल्हास्तरावर पाचवा क्रमांक पटकावत विभागीय स्तरावर आपली चमक दाखवली आहे.क्रीडाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी आपली छाप सोडली आहे. दुग्धशर्करायुक्त योग विदर्भ साहित्य संघातर्फे सत्र २०२४–२५ मध्ये घेण्यात आलेल्या ‘प्रथम भाषा मराठी साहित्य परिचित भाग – २’ या परीक्षेत कु. अक्षरा नरेश सोनटक्के हिने विदर्भातून प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटीचे उपाध्यक्ष, ॲड. संजय धोटे, संस्थेचे कोषाध्यक्ष सतिश धोटे,संस्थेचे सचिव डॉ. अर्पित धोटे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अल्पना कवाडे, उपप्रमुख प्रा. रोहित रांजीकर, तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारीवृंद यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी महाविद्यालयाची मान व प्रतिष्ठा उंचावली आहे.







