✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.5 ऑक्टोबर) :-
अमरावती विभागात शिक्षणक्षेत्रातील शिक्षण सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती वनमालाताई राठोड यांची आश्रम शाळा संस्था चालक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. आश्रम शाळा संस्था चालक संघाच्या अमरावती येथील सह विचार सभे दरम्यान झालेल्या निवडीबद्दल ताईंचे शिक्षण क्षेत्रात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शिक्षण क्षेत्रातील कुशल नेतृत्व असलेल्या वनमालाताई राठोड यांची नुकतीच 4 ऑक्टोबर रोजी अमरावती येथे पार पडलेल्या आश्रम शाळा संस्थाचालक संघाच्या एका कार्यक्रमांमध्ये आश्रम शाळा संस्थाचालक संघाच्या उपाध्यक्ष पदाची धुरा देत ही निवड करण्यात आली. महागाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात ताईंच्या कुशल नेतृत्वाखाली चालणाऱ्या शाळा, कॉलेज आणि कॉन्व्हेंट ह्या आज संपूर्ण विभागात सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून परिचित आहे.
श्रीमती वनमाला ताईंच्या दूरदृष्टीमुळे आणि शिस्तबद्ध धोरणामुळे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे तर चारित्र्य, संस्कार आणि प्रगती मध्ये नेहमी आघाडीवर असतात.
ताईंचा प्रभाव आणि मार्गदर्शना मुळे शाळा वसतिगृह, कॉलेज आणि कॉन्व्हेंट महागांव तालुक्यांत आज आदर्श ठरत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडविण्याची ताकद ताईंच्या कार्यात दिसून येते. शिक्षण क्षेत्रात नवनवीन उंची गाठत असलेल्या वनमालाताई राठोड यांची आश्रम शाळा संस्थाचालक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने अनेक संस्थांच्या समस्या मार्गी लागणार आहेत. ताईच्या या निवडीमुळे आश्रम शाळा संस्था चालकातून आनंद व्यक्त होत आहे.







