🔹पती पत्नी शेतात कामं करीत असताना घडली घटना.पती जखमी
✒️ सौ .सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा(दि .6 ऑक्टोबर) :—
राजुरा पासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या कोहपरा – पंचाळा शिवारात शेतात वीज कोसळल्याने काम करीत असलेल्या पत्नी ज्योत्सना प्रमोद कन्मपलीवार (२८ ) वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.या दुर्घटनेत पती प्रमोद कन्मपलीवार सह आणखी दोन जण जखमी झाले आहे. कोहपरा – पंचाळा शिवारात अचानक दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच शिवारात पत्नी ज्योत्सना व पती प्रमोद कान्मपलीवार हे दाम्पत्य काम करीत होते.
अचानक शिवारात वीज कोसळली व त्यात पत्नी ज्योन्स्ना कन्मपलीवार वय २८ वर्षे हिचा जागीच मृत्यू झाला व पती प्रमोद कन्मपलीवार वय ३६ वर्षे जखमी झाला आहे. यांच्या सोबत काम करणाऱ्या मंजुषा जिवतोडे वय ४० वर्षे व मंदा कन्मपलीवार वय ६० वर्ष दोन महिला जखमी झाल्या आहे.वीज कोसळलेल्या जागेपासून आणखी तीन व्यक्ती लांब असल्याने त्यांचा जीव वाचला. या तिघांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.







