काळी (दौ.) ग्रा.प.ला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी द्या – जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी सोशल मीडिया

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि.26 सप्टेंबर) :- 

महागाव तालुक्यातील काळी (दौ.) गावाचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने ग्रामपंचायत मार्फत विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी या ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी नसल्याने अनेक विकासात्मक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने महागाव गटविकास अधिकाऱ्याकडे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नेमणूक होण्याची मागणी केली आहे. 

    काळी (दौ.खा.) ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी मागील अनेक दिवसापासून नियमितपणे नसल्यामुळे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज तसेच विविध शासकीय योजना राबविण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. या ठिकाणी सध्या ग्रामविकास अधिकारी एम.एन. वाडगे रुजू आहेत. परंतु त्यांचा इतरत्र ठिकाणी पदभार असल्यामुळे ते काळी दौलत खान या ठिकाणी नेहमी उपस्थित राहू शकत नाहीत.

त्या मुळे नागरिकांना वेळेत सुविधा मिळणे दुरापस्थ झाले आहे. ग्रामविकास अधिकारी नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्रामपंचायतीचे नियमित प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले आहे. शासकीय योजना व अनुदान वेळेवर उपलब्ध होत नाही. गावातील विकास कामे वेळेमध्ये पूर्ण होऊ शकत नसल्याने मोठ्या समस्या उद्भवत आहेत. गावकऱ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे, नोंदी वेळेवर मिळण्यासाठी अडथळे येत आहेत. म्हणून महागाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी काळी दौलत खान येथे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करून गावाच्या विकासाला गती द्यावी. काळी दौलत खान ही तालुक्यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाते.

या गावातील नागरिकांना विविध समस्या उद्भवत आहे.वाडगे नामक ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे दोन गावाचा चार्ज असल्यामुळे त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्या मुळे काळी दौलत खान या ग्रामपंचायत मध्ये नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या करिता हंसराज भाऊराव मोरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया यांनी 25 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन दिले आहे.