🔸ययाती नाईक जन्मदिनी प्लॅस्टिक सर्जरी शस्त्रक्रिया शिबिरास भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांनी संबोधित केले
✒️विश्वनाथ महामुने महागाव( Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.22 सप्टेंबर) :-
अग्रवाल मंगल कार्यालय पुसद जी.यवतमाळ येथे 20 सप्टेंबर रोजी युवानेते ययातीभाऊ नाईक मित्र मंडळ, स्माईल ट्रेन संस्था अमेरिका, कै.डॉ.एन.आर.सलाम पुरिया संस्थापक श्रीराम हॉस्पिटल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.
या शस्त्रक्रिया शिबिरामध्ये 41 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया शिबिर घेणाऱ्या येयाती नाईक मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या समाज उपयोगी उपक्रमाला धन्यवाद देत, कार्यांचे कौतुक केले.प्रसंगी या शिबिराच्या वेळी तपासणी दरम्यान 17 आढळले. रुग्णांना उपचारासाठी श्रीराम हॉस्पिटल अकोला या ठिकाणी प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिभूषण दीपकभाऊ आसेगांवकर हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पुसद जिल्हाध्यक्ष भाजप डॉ.सौ.आरतीताई फूफाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष सौ. अनिताताई मनोहरराव नाईक, विशेष अतिथी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे, भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ- पुसद जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा,ॲड.आशिषभाऊ देशमुख हे होते./
प्रमुख उपस्थिती वसंतराव पाटील कान्हेकर, श्याम पाटील, विनोद जिल्हेवार, गोविंदराव फुके, रामकृष्ण चंदेल पाटील, राजन मुखरे, गुलाबराव जाधव,सदबाराव मोहटे, सुरेश धनवे, सुधिर देशमुख, माधवराव वैद्य, अशोक वडते, उमाकांत पापीनवार, विश्वास भवरे, सुभाष राठोड, अजय पुरोहीत, निखील चिद्दरवार, नारायण पुलाते, निलेश पेन्शनवार, रामराव चव्हाण, प्रमोद देशमुख, डॉ.तुषार राठोड, सौ. वृषालीताई नाईक वडत्या, सौ. मृणाल जाधव,सौ. सीमा पापीनवार, सौ.अरुणा जाधव यांचे सह अनेक नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे जीवन ज्योती एड्स प्रतिबंध व प्रबोधन पुसद, राजूभाऊ पाटणकर, मिशन ग्रीन भवानी टेकडी यांना ययाती नाईक जनसेवा पुरस्कार2025 ने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील गुद्धटवार,सूत्रसंचालन साहेबराव राठोड व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दत्ता पवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशवितेसाठी आयोजक ययातीभाऊ नाईक मित्र मंडळाच्या सर्व सन्मानीय सदस्यांनी परिश्रम घेतले.







