✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.17 सप्टेंबर) :-
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते शुक्रवारी 12 रोजी शिंदे शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख म्हणून कृषिभूषण लक्ष्मीबाई पारवेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाने मोर्चे बांधणीचा चंग बांधला आहे. त्याकरिता नवीन शिलेदारांच्या जिल्हाभरात निवड करण्यात आल्या. सवना गावच्या रहिवाशी असलेल्या कृषी भूषण म्हणून गौरव झालेल्या लक्ष्मीताई पारवेकर यांची शिवसेना नेते पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे महिला कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर लक्ष्मीताई पारवेकर यांनी मंत्री संजय राठोड यांच्यासोबत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.
पक्षांतरानंतर पार पडलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पडली. तालुक्यात सह जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या द्वारे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाली आहे. आगामी निवडणूकीत पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची मोठी जबाबदारी पारवेकर ताई यांच्यावर आली आहे.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रमाणे पाच तालुका प्रमुख व दहा विभाग प्रमुख महिला आघाडी व युवा सेनेची बांधणी करण्यामध्ये उपजिल्हाप्रमुख डॉ. बी. एन. चव्हाण, राजू राठोड यांचे सहकार्याने 12 रोजी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लक्ष्मीताई पारवेकर यांनी आपल्या निवडीचे श्रेय संजय भाऊ राठोड, पश्चिम विदर्भ समन्वयक श्रीधर मोहोड, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, सह संपर्क प्रमुख चितांगराव सर यांचे समवेत डॉक्टर बी. एन. चव्हाण, राजू राठोड यांना दिले आहे.







