माहूर शहरात वाहनधारकांना शिस्त लावण्याकरता ट्राफिक पोलीस ची नियुक्ती करा भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष पवन चव्हाण 

✒️शेख रफीक माहूर(Mahur तालुका प्रतिनिधी)

माहूर(दि.16 सप्टेंबर) :- साडेतीन शक्तीपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाकरिता येत असतात माहूर हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभर या ठिकाणी अनेक उत्सवानिमित्त यात्रा असतात तसेच दैनंदिन हजारोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी गडावर येत असतात.

परंतु या ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक ला कोणती शिस्त नसल्यामुळे शहरांमध्ये भरधाव वेगाने मोटरसायकली चालविणे ,अल्पवयीन मुले लायसन नसताना मोटरसायकल चालविणे ,मोटरसायकलचे सायलेन्सर काढून फटाके फोडणारे सायलेन्सर बसविणे ,विचित्र प्रकारचे कर्कश् आवाज करणारे हॉर्न लावणे ,अशा प्रकारचे वाहनधारकांमधून बेसिस्तपणा दिसून येत असल्यामुळे माहूर शहरामध्ये ट्राफिक पोलिसाची नेमणूक करून नियम मोडणाऱ्या वांहनधारकावर दंडात्मक कारवाई करावी व शहरामध्ये अनेक जनावर मोकाट फिरत असतात व त्यामुळे अनेक अपघात झाल्याचे चित्र आहे.

शहरांमध्ये मोकाट जनावर सोडणाऱ्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशा आशयाचे निवेदन भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष ,पवन चौहान ,व युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष, गौरव जयस्वाल ,अश्विन जोशी, समाधान पाईकराव ,यांच्यावतीने माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ,गणेश कराड, यांना निवेदन देण्यात आले.