पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्या… शिवसैनिक प्रतीक खीरटकर यांची मागणी

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.14 सप्टेंबर) :- 

सततच्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तलाव तूटुंब भरून वाहत आहेत.कोकेवाडा तु .नंदोरी क्षेत्रातील कोकेवाडा धानोली किनल्या सोनेगान शेगाव खुर्द पारोधी या गावालगतच्या इराई नदीला प्रचंड महापूर आला या महापुरामुळे गावालगतच्या शेता मध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोयाबीन कापूस धान तूळ याची लागवड केली .पण सततच्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकात पावसाचे पाणी साचल्यामुळे पिकाचे नुकसान झाले पूर्ण पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे तसेच पिकावर रोगाचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे .

तरी शासनाने लवकरात लवकर झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी कोकेवाडा तुकूम येथील शिवसैनिक प्रतीक अभय खीरटकर यांनी केली आहे.