महागाव न.प. मुख्याधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षऱ्या करून घरकुलचा महाघोटाळा

🔹घरकुलाच्या १८ फाईल गहाळ महागाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

🔸महागाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट अधिकारी ,पदाधिकारी आणि नगरसेवक यांचे धाबे दणाणले

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव (दि.9 सप्टेंबर) :- 

महागाव नगरपंचायत हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ देतांना कोणत्याही नियम,अटी न पाळता मुख्य कार्यकारी अधिकारी व नगरपंचायतचे अभियंता यांच्या बनावट स्वाक्षऱ्या मारून घरकुलाच्या बोगस लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देऊन मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे दिसून आल्यामुळे दि. २८ अगस्ट २०२५ रोजी नगरपंचायत लिपिक अमोल गाडबैले यांचेकडून पदभार काढून कुलदीप राजनकर यांचेकडे देत असतांना चार्ज घेतांना घरकुल योजनेच्या १८ फाईल गाळ असल्याचे निदर्शनास आले. 

  त्यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासन अधिकारी नितीन चव्हाण यांना ४ / ८ / २०२५ रोजी पत्र देऊन महागांव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी आदेशित केले. त्या अनुषंगाने दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी महागाव पोलीस स्टेशनला प्रशासन अधिकारी नितीन चव्हाण यांनी रीतसर तक्रार दाखल केली‌.

अमोल सिताराम गाडबैले नगसंचायत कर्मचारी यांनी १८ फाईल गहाळ केल्याबाबत व घरकुल योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना न देता बोगस लाभार्थ्यांना दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशा आशयाची तक्रार महागाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. महागाव पोलीस स्टेशन येथे सा. ना .क्र. २२ / २०२५ दाखल करून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्या मुळे या घोटाळ्यातील भ्रष्ट असलेल्या अधिकारी व पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी मोठ्या प्रमाणावर केलेला भ्रष्टाचार उघड होऊन लवकरच संबंधितावर गुन्हे दाखल होणार अशी प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी विश्वनाथ महामुने यांचे कडे महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी दिली आहे.