✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.9 सप्टेंबर) :- महाराष्ट्र राज्यातील समस्त गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातुन आरक्षण लागू करण्यासाठी व बंजारा समाजाचे आरक्षण जातीनिहाय जनगणना नुसार व्हि.जे. एन. प्रवर्गात होणारी घुसखोरी तसेच नाॅनक्रीमीलीयरची अट रद्द करण्याबाबत या महत्त्वाच्या मुद्द्यांवर समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर ८ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबईतील चर्चगेट येथील आयएमसी हाॅल मध्ये या महत्वपूर्ण विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी मंत्री संजय राठोड, आमदार बाबुसिंग महाराज, आमदार राजेश राठोड, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार निलय नाईक, अँड. मोहिनी नाईक,डॉ. तुषार राठोड, डॉ. टी.सी. राठोड,महंत जितेंद्र महाराज, प्रा. संदेश चव्हाण यांचे सह इतर सर्व लोकप्रतिनिधी व मान्यवर समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. समाजांच्या सर्व विषयांवर उपस्थितांचे मत ऐकुन ती मते मंत्रीमंडळाच्या उपसमिती समोर मांडण्याचे या वेळी सर्वानुमते ठरविण्यात आले.







