राज्य महामार्गावर आरक्षणासाठी रस्तारोको केल्याने मराठा युवकांसह मुस्लिम बांधवावर महागाव पोलिसांत गुन्हे दाखल

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि.3 सप्टेंबर) :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करिता मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबई येथे उपोषण करून सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. त्यांना साथ देत महाराष्ट्रातला समस्त मराठा समाज हा मुंबईमध्ये दाखल झाला होता. त्या समर्थनात 1 सप्टेंबर सोमवारी महागाव तालुक्यांतील मराठा युवकांसह मुस्लिम बांधवांनी नागपूर तुळजापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले होते, जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांचे महामार्गावर आंदोलन करण्यास मनाई असतांना आरक्षण मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आल्याने गुन्हे नोंद करण्यात आले. 

    तालुक्यातील समस्त मराठा बांधव सह इतर समाज बांधव सुद्धा उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता या आंदोलनात फुलसावंगी येथील मुस्लिम कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांची उपस्थिती दर्शवली होती. सकल मराठा समाजाच्या 30 आंदोलकावर महागाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे नोंद झाले आहेत, मध्ये मुस्लिम आंदोलन सहभागी आहेत.

या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम समाज हा मराठा समाज यांच्या सोबत उभा राहतांना दिसला. ज्या पद्धतीने मदत करता येईल, त्या पद्धतीने मुस्लिम बांधवानी मदत केली. याच अनुषंगाने एक खारीचा वाटा म्हणून मुस्लिम बांधवानी यांनी सुद्धा मराठा बांधवांसह महागाव येथे रस्ता रोको आंदोलन केले.आणि यात रस्ता रोको आंदोलनात मराठा बांधवासह मुस्लिम बांधवावर सुद्धा यांच्यावर ही गुन्हा दाखल झाला.आज फुकट काहीच मिळत नाही जे काही मिळवायचे आहे ते संघर्षातूनच मिळवावे लागते. त्यामुळे समाज असे कितीही गुन्हे अंगावरती घ्यायला तयार आहे.

गुन्हे नोंद झालेल्या मध्ये शैलेश कोपरकर,शिवाजीराव देशमुख, उदय नरवाडे,नितीन नरवाडे, अमर नरवाडे, शिवाजी नरवाडे, तेजस नरवाडे, सुरेश देशमुख, विशाल पवार, संदीप ठाकरे, आशिष देशमुख, गोविंदराव देशमुख, हंसराज मोरे, समाधान राऊत, नितीन नरवाडे,अमोल नरवाडे, स्वप्निल अडकिने, प्रवीण ठाकरे, गोलू नरवाडे, प्रवीण नरवाडे, बबनराव गावंडे, राहुल वानखेडे, अविनाश नरवाडे,पंकज देशमुख, आणि गजानन देशमुख, यांचे सह फुलसांगवी येथील कयाम नवाब यांचा समावेश आहे. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलनामध्ये मुस्लिम बांधव सहभागी झाले.